खूप दिवसांपासून काहीतरी लिहायची इच्छा होती, बराचसा विचारही केला की सुरवात करू तरी कुठून आणि गमतीच म्हणजे बाकीच्या लेखकांनी अणि कविंनी ठेवले तरी काय लिहायला, अणि मी लिहालेलं कितिसं तुम्हाला आवडेल माहित नाही पण परत विचार केला काय फरक पडतो कोणाला आवडेल, कोणाला नाही,पण मला अवाडलं बासं.एक समाधान तरी वाटेल. आपण कोणत्याही कामाची सुरवात करायची झाली तर श्री च्या नाव घेवुन करतो. माझ्या बाबतीत जरा वेगळ आहे, कारण देवाच्या बाबतीत जरा मी नास्तिक आहे म्हणून सुरवात माझ्या निर्मात्यांपासून म्हणजेच माझ्या बाबा पासून करतोय शेवटी निर्माते ते आहेत अणि लहाणपनापसून ऐकत आलो आहे की निर्मात्याला अपण देव माणतो मग माझ्या मतानुसार मी कोणाच्या नावाने सुरवात करायला पाहिजे हे मग तुम्हीच मला सांगा. एक आहे ह्या गोष्टीने माझ्या लिखाणाची सुरवात करायला मला संधी मिळाली अणि विषय ही सापडला. म्हणून परमेश्वराला धन्यवाद म्हणायच्या च्या ऐवजी थ्यांक्स बाबा म्हणेन.
आपण नेहमी बाबा म्हटलं की एक आपल्या मनातच एक विश्वासाचा हात, आधार, एक असं सगाल्याचं मिश्रण असलेली व्यक्तिरेखा , रागीट स्वभाव अणि डोळ्यात एक स्वाभिमानपणा असं सगळ. पण त्या रागीट स्वभावाच्या मागच रूप, त्यांचा स्वभाव, मृदुपणा आपल्याला माहित नसतो....
ते रूप मी पाहिलयं ,
मी माझ्या बाबांना रडताना पाहिलयं
मी माझ्या बाबांना खचताना पाहिलयं,
मी ते पहाड़ विर्घळताना पाहिलयं ,
मी माझ्या बाबांना रडताना पाहिलयं
मी माझ्या बाबांना रडताना पाहिलयं ........
आता मला आठवतयं ,
इवल्याश्या ओठातून बाबा म्हणवुन घेताना ,
चिमुकले पाय ते सावरून घेताना,
चुकल्या क्षणी खडसावताना ,
पण त्याच रागात,
पण त्याच रागात,
मवू कापसाच्या स्पर्शागत त्याच मवू गालावर चिमटा घेताना पाहिलयं ,
मी माझ्या बाबांना रडताना पाहिलयं
मी माझ्या बाबांना रडताना पाहिलयं .......
खूप खेळतो,
खूप त्रास देतो,
आश्या आईच्या तक्रारींवर मारताना,
पण सोबत खेळताना,
अणि आईची थट्टा करताना ,
लहानगे होताना पाहिलयं मी,
मी माझ्या बाबांना रडताना पाहिलयं
मी माझ्या बाबांना रडताना पाहिलयं .......
माझ्याशी लावलेल्या शर्यतीत धावताना ,
क्षणिक आनंदासाठी त्यांना हरताना,
ठेच लागल्यावर त्यांची कळ-कळ
आजारी पडल्यावर त्यांची तळमळ,
चार क्षणांच्या माझ्या झोपेसाठी रात्र रात्र जागताना पाहिलयं ,
मी माझ्या बाबांना रडताना पाहिलयं
मी माझ्या बाबांना रडताना पाहिलयं .......
हातात हात धरून जग दाखवताना ,
गर्दीत सावरताना ,
पण ह्या गर्दीत अगदी नकळत,
चुकून हात सुटला ,
बावरा होताना पाहिलयं ,
मी माझ्या बाबांना रडताना पाहिलयं
मी माझ्या बाबांना रडताना पाहिलयं .......
.......... आनन म्हात्रे.