गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१२

" आई म्हणजे मंदिराचा उंच कळस ,
अंगणातील पवित्र तुळस ,
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी , वाळवंटात प्यावं अस थंडपाणी ,
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी
आणि वेदनेनंतरची सर्वाँत पहिली आरोळी ".

        आपण आईला नेहमीच एखाद्या कवितेच्या उपमा अलंकारात बधण्याचा प्रयत्न केला आहे किंवा   आपण तो केलेला पहिला आहे ...
खरंच का ? ;;;;;;;तीला आपण काहीश्या शब्दांमध्ये   बांधु शकतो किंवा रचू शकतो  का?
नाही ना ?
ती तर अथांग आहे ना ?
सृष्टी सुद्धा कमी पडावी अशी ती आहे;;
मी ज्या ज्या वेळी तिला कवितेत उतवण्याचा प्रयत्न केला नेहमीच असफल राहिलो  एव्हाना मला तिच्या तोलामोलाचे शब्दच सापडले नाही म्हणजे ते अस्तित्वातच नाही  असे म्हणता येईल...
बघ मग जरा विचार करा जो अवघ्या विश्वावरसुद्धा विजय मिळवतो असा कविसुद्धा इथे कमी पडतो ......
म्हणूनच वरील उप्डते ला दिलेलं उत्तर ;;;;;
   
नको बोलू नुसता कळस ,
मंदिरातील मूर्ती जशी,
तसं मन तीच साळस  ,

गाभ्या परी कूस तिची,
घुमटा परी माया तिची  ,

आरती तिची अंगाई भासे,
मनामनात सर्वांच्या वसे,

नाही ती फक्त दुधावरची साय ,
ती तर त्याच्या भांडाराची गाय ,

शब्दामधी बांधून घ्यावी ,
कुण्या कवीची उपमा व्हावी ,
अशी ती तर अजिबात नाय ,
सरस्वती सुद्धा कमी पडावी,
अशी विश्वरूपी  ती हाय ,,,,,,
अशी विश्वरूपी  ती हाय ,,,,,,
                         आनन म्हात्रे .....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा